कोरोना पार्श्वभूमीवर सनियंत्रण समितीची तातडीने बैठक घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:27 AM2021-05-25T04:27:15+5:302021-05-25T04:27:15+5:30
इचलकरंजी : शहर व परिसरातील वाढत्या कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी, तसेच तिसरी लाट उद्भवण्यापूर्वी लहान मुलांसाठी स्वतंत्र वैद्यकीय सेवा-सुविधांसह ...
इचलकरंजी : शहर व परिसरातील वाढत्या कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी, तसेच तिसरी लाट उद्भवण्यापूर्वी लहान मुलांसाठी स्वतंत्र वैद्यकीय सेवा-सुविधांसह अद्ययावत कोविड केअर केंद्र सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर शहर सनियंत्रण समितीची तातडीने आढावा बैठक घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ताराराणी आघाडीचे नगरसेवक सागर चाळके यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांना दिले.
निवेदनात, जिल्ह्यासह शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोेठ्या प्रमाणात वाढत आहे. याला अटकाव घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी १६ ते २३ मे दरम्यान कडक लॉकडाऊन लागू केला होता. त्यास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या आठ दिवसांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील काळात कोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात. त्याचबराबेर नगरपालिका प्रशासनाकडून शहरातील विविध भागातील कारखानदारांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यावेळी प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे दंड आकारला जात असून, अतिरिक्त पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याने उपाययोजना म्हणून राजीव गांधी सांस्कृतिक भवन, मंगलधाम अशा सांस्कृतिक भवनात लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड केअर केंद्र सुरू करण्यात यावे, या सर्व विषयांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी समितीची बैठक घेण्याची आवश्यकता असल्याचे चाळके यांनी म्हटले आहे. यावेळी पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे व इकबाल कलावंत उपस्थित होते.