कोल्हापूर जिल्ह्यांत सायबर गुन्ह्यांसाठी अमेरिकेची मदत

By admin | Published: July 3, 2017 03:40 PM2017-07-03T15:40:48+5:302017-07-03T15:40:48+5:30

वर्षभरात २५ गुन्हे, एकाची उकल

US aid to cyber crimes in Kolhapur districts | कोल्हापूर जिल्ह्यांत सायबर गुन्ह्यांसाठी अमेरिकेची मदत

कोल्हापूर जिल्ह्यांत सायबर गुन्ह्यांसाठी अमेरिकेची मदत

Next

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0३ : मोबाईल एसएमएस, ई-मेल, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर, आदी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून जिल्ह्यांत वर्षभरात २५ आॅनलाईन फसवणूकीचे गुन्हे पोलीस दप्तरी दाखल आहेत. त्यापैकी एक गुन्हा उघडकीस आनण्यात सायबर विभागाला यश आले आहे.

सायबर गुन्हे उघडकीस आनण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व लॅब भारतात उपलब्ध नाहीत. फेसबुक व ईमेलच्या वेबसाईटचे केंद्रबिंदू अमेरिका आहे. त्यासाठी असे गुन्हे उघडकीस आनण्यासाठी येथील तज्ज्ञांची मदत सायबर विभाग घेत आहे. स्वतंत्र पोलीस ठाणे, सायबर लॅब, विविध तांत्रिक साधनसामग्री व सॉफ्टवेअर्सद्वारे प्रलंबित सायबर गुन्हे उघडकीस येतील असा विश्वास पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

सोशल मीडियामधून वेगवेगळे संदेश पाठवून समाजात तेढ निर्माण होईल, असे प्रयत्न केले जात आहेत. इंटरनेट बँकिंगद्वारे फसवणूक, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर, मोबाईल व इतर माध्यमांतून होणारी महिला, युवतींची बदनामी व ब्लॅकमेलिंग, माध्यमांद्वारे होणाऱ्या २५ पेक्षा जास्त तक्रारी वर्षभरात दाखल झाल्या आहेत. या गुन्ह्यांमध्ये कोल्हापुरातील दोघा उच्चवर्णीय युवतींचे फेसबुक अकौंट हॅक करून त्यांच्याकडे पैशांची मागणी केल्याप्रकरणी वडणगे (ता. करवीर) येथील संशयित आरोपी प्रशांत चौगुले याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावर अज्ञातांनी निकालाच्या पानावर अनधिकृतपणे आक्षेपार्ह नोंदी करून बारावीची तीन संपूर्ण बनावट गुणपत्रके तयार केल्याचे आढळून आले होते. मंडळाने याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास कोल्हापूर व पुणे सायबर क्राइम ब्रँच करीत आहे.

यासह बँक खात्याची माहिती घेवून लाखो रुपयांना गंडा घातल्याच्या तक्रारीही सायबरकडे आल्या आहेत. जी. एस. टी. करप्रणालीमुळे बरेचसे व्यवहार इंटरनेट बँकिंगद्वारे, आॅनलाईन झाले आहेत. अशा व्यवहारांमध्ये गैरप्रकार घडण्याची शक्यता आहे. हे गैरप्रकार रोखण्याचे काम सायबर पोलीस ठाणे करणार आहे. पोलीस निरीक्षक औंदूंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक शितल जाधव, कॉन्स्टेबल अमित सर्जे, राजेंद्र निगडे, अमर आडसुळे, अमर वासुदेव आदी सायबर विभागाचे काम हाताळत आहेत. 

Web Title: US aid to cyber crimes in Kolhapur districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.