उसदराचे आंदोलन चिघळले; शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांचा उद्रेक 

By विश्वास पाटील | Published: November 13, 2023 11:49 AM2023-11-13T11:49:31+5:302023-11-13T11:51:36+5:30

टाकळीवाडी येथील गुरुदत्त कारखान्यासमोर स्वाभिमानी कार्यकर्ते आणि कारखाना समर्थक आमनेसामने आले.

usdar agitation raged farmers outbreak in shirol taluka | उसदराचे आंदोलन चिघळले; शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांचा उद्रेक 

उसदराचे आंदोलन चिघळले; शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांचा उद्रेक 

विश्वास पाटील, कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिरोळ तालुक्यातील ऊस तोड सुरू असलेल्या शेतात घुसून तोड बंद करत बैलगाडी पलटी केल्या शेतकऱ्यालाही मारहाण करण्यात आली. कारखान्या च्या विरोधात स्वाभिमानी संघटना व आंदोलन अंकूश एकत्र आल्याने आंदोलनास जास्त धार आली आहे.

टाकळीवाडी येथील गुरुदत्त कारखान्यासमोर स्वाभिमानी कार्यकर्ते आणि कारखाना समर्थक आमनेसामने आले. गुरुदत्त कारखान्याच्या ऊस तोड सुरू असल्याने बाळूमामा मंदिराजवळ ऊस अडविण्यासाठी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून बसले आहेत. तर ऊस वाहतूक करण्यासाठी कारखाना समर्थक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुरुंदवाड पोलिस ठाण्याने जलद कृती दल बोलावून मोठा बंदोबस्त ठेवला आहे. वातावरण तणावपूर्ण आहे..कारखानदार ऊस तोड करण्यासाठी ताकद लावत आहेत तर आंदोलकही तेवढ्याच त्वेषाने त्याला विरोध करत असल्याचे चित्र दिसत आहे..गटवर्षीच्या उसाला ४०० रुपये जादा आणि यंदाच्या हंगामातील उसाला ३५०० रुपये एकरकमी दिल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही अशी संघटनेची आक्रमक भूमिका आहे..

Web Title: usdar agitation raged farmers outbreak in shirol taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी