पेट्रोल पंपाच्या परवान्यासाठी ग्रामपंचायतीच्या बनावट कागदपत्रांंचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:21 AM2021-02-08T04:21:35+5:302021-02-08T04:21:35+5:30

आजरा : खेडे (ता. आजरा) गावच्या हद्दीत आजरा-गडहिंग्लज रोडवर मुंगूसवाडीनजीक गट नं. १६२/२ मध्ये नियोजित पेट्रोल पंपाचे काम सुरू ...

Use of forged Gram Panchayat documents for petrol pump license | पेट्रोल पंपाच्या परवान्यासाठी ग्रामपंचायतीच्या बनावट कागदपत्रांंचा वापर

पेट्रोल पंपाच्या परवान्यासाठी ग्रामपंचायतीच्या बनावट कागदपत्रांंचा वापर

Next

आजरा :

खेडे (ता. आजरा) गावच्या हद्दीत आजरा-गडहिंग्लज रोडवर मुंगूसवाडीनजीक गट नं. १६२/२ मध्ये नियोजित पेट्रोल पंपाचे काम सुरू आहे. सदर पेट्रोल पंपाची जागा ग्रामस्थांना अंधारात ठेवून हडप केली आहे. पेट्रोल पंपाच्या परवानगीकरिता ग्रामपंचायतीचे बनावट दाखले वापरले असल्याचा आरोप उपसरपंच संगीता शिंदेंसह सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला.

पेट्रोल पंपाचे काम सुरू असलेल्या जमिनीचा न्यायालयात दावा सुरू आहे. जमिनीतील कुळांना अंधारात ठेवून काहींनी आपल्या नावे जमीन करून तिची विक्री केली आहे. पेट्रोल पंपाच्या परवान्यासाठी सादर करावयाच्या कागदपत्रांमध्ये ग्रामपंचायतीच्या ना-हरकत दाखल्याचा समावेश आहे. ग्रामपंचायतीचा बोगस दाखला घेऊन परवाना मिळविला आहे. या दाखल्याबाबत ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सभेत चर्चा झालेली नाही व ठरावही मंजूर केलेला नाही. याबाबत सदस्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना विचारले असता त्यांनीही दाखला दिला नसल्याचे सांगितले. बनावट कागदपत्रे तयार करून परवानगी मिळालेल्या पेट्रोल पंपाची परवानगी रद्द करा, अशीही मागणी सदस्यांनी केली आहे. निवेदनावर उपसरपंच संगीता शिंदे, सदस्या शारदा सावंत, श्रीपती नरके, संदीप पाटील, विजय पालकर, प्रकाश चव्हाण, शोभा लकमले, स्मिता गोडसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------------------------------------------

* कारवाईस सरपंच, ग्रामसेवकांची चालढकल

ग्रामपंचायतीच्या बनावट कागदपत्रांआधारे ना-हरकत पत्र घेऊन पेट्रोल पंपाचा परवाना घेतला आहे. याबाबत सरपंच व ग्रामसेवक तक्रार देण्यास चालढकलपणा करीत आहेत. आर्थिक व्यवहार झाल्यामुळेच दोघांनी कारवाईस नकार दिला आहे, असाही आरोप यावेळी उपसरपंच संगीता शिंदे यांनी केला.

Web Title: Use of forged Gram Panchayat documents for petrol pump license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.