समग्र शिक्षणच्या निधीचा इतर कामांसाठी वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:51 AM2021-02-05T06:51:25+5:302021-02-05T06:51:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेला समग्र शिक्षण अंतर्गत प्राप्त झालेला निधी इतर कामासाठी बॅँकेतून काढल्याचे समजते. शासनाचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेला समग्र शिक्षण अंतर्गत प्राप्त झालेला निधी इतर कामासाठी बॅँकेतून काढल्याचे समजते. शासनाचा या संकल्पनेमागील हेतू लक्षात घेऊन कार्यवाही करावी. यामध्ये बेकायदेशीर निधी खर्च केलेले आढळल्यास त्यांच्याविरोधात शिक्षणाधिकारी, कोल्हापूर जिल्हा यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला आहे. तसेच या मागणीचे निवेदन प्रशासनाधिकारी, इचलकरंजी शिक्षण मंडळ यांना दिले.
निवेदनात, महाराष्ट्र शासनाकडून २६ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिकांना विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य विकसित करण्यासाठी युवा क्लब स्थापन करणे या कामासाठी निधी वितरित केला गेला आहे. ११ मार्च २०२० रोजी दोन हजार ६६ शाळांमध्ये युवा व युको क्लब स्थापन करण्यासाठी ११३२ प्राथमिक शाळांना प्रतिशाळा पाच हजार रुपये व एकूण ९३४ प्राथमिक शाळांना प्रतिशाळा १० हजार रुपये असा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च २०२० पासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे हा निधी अखर्चित राहिला आहे. या निधीमधून शाळेच्या मुख्याध्यापकांना स्टेशनरी खरेदी करावी, असे तोंडी आदेश चार दिवसांपूर्वी एका बैठकीत दिल्याचे समजते. ही संकल्पना समजून न घेता निधी केवळ स्टेशनरी खरेदी करण्यासाठी वापरणे हे गैर आहे, असे म्हटले आहे.