प्लास्टिक पिशव्यांचा वापर; १४ दुकानांना ७५ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:29 AM2021-02-17T04:29:59+5:302021-02-17T04:29:59+5:30
कोल्हापूर : शहरातील प्लास्टिक पिशव्या बंदी आदेशानुसार गेल्या आठ दिवसांत महापालिकेच्या पथकांनी विविध १४ दुकानांवर प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याबद्दल ...
कोल्हापूर : शहरातील प्लास्टिक पिशव्या बंदी आदेशानुसार गेल्या आठ दिवसांत महापालिकेच्या पथकांनी विविध १४ दुकानांवर प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे ७५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
प्लास्टिक वापरावर शहरात बंदी असतानाही काही व्यापारी, व्यावसायिक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व उपायुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकामार्फत मोहीम राबविली आहे. या पथकाने दि. ८ ते १५ फेब्रुवारीदरम्यान सासने ग्राऊंड, मार्केट यार्ड परिसर, अंबाबाई मंदिर परिसर, लक्ष्मीपुरी, महाराणा प्रताप चौक, शाहूपुरी, कावळा नाका, शिंगोशी मार्केट परिसरातील चौदा दुकानांवर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे रुपये ७५ हजारांचा दंड वसूल केला.
सदरची कारवाई इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, मार्केट आरोग्य निरीक्षक लखन व शाहूपुरी पोलीस यांनी केली.