उद्योगातील समस्या सोडविण्यासाठी सिक्स सिग्माचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:20 AM2021-01-15T04:20:36+5:302021-01-15T04:20:36+5:30

शिरोली : सिक्स सिग्मा प्रशिक्षणाचा उपयोग उद्योगामधील समस्या सोडविण्यासह चांगले तंत्रशिक्षण आत्मसात करण्यासाठी होईल, असे प्रतिपादन सिक्स ...

Use of Six Sigma to solve problems in the industry | उद्योगातील समस्या सोडविण्यासाठी सिक्स सिग्माचा वापर

उद्योगातील समस्या सोडविण्यासाठी सिक्स सिग्माचा वापर

googlenewsNext

शिरोली : सिक्स सिग्मा प्रशिक्षणाचा उपयोग उद्योगामधील समस्या सोडविण्यासह चांगले तंत्रशिक्षण आत्मसात करण्यासाठी होईल, असे प्रतिपादन सिक्स सिग्माचे अभिजित कोपर्डे यांनी केले. शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (स्मॅक) व भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (एमएसएमई) संयुक्त विद्यमाने सिक्स सिग्माकडे वाटचाल आणि समस्येचे निराकरण करण्याचे तंत्र या विषयाचे पाच दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या समारोप कार्यक्रमाच्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील होते. एमएसएमई विकास वर्मा प्रमुख उपस्थित होते. हा कार्यक्रम स्मॅक भवन रामप्रताप झंवर सभागृहात झाला. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप समारंभ व प्रेझेंटेशन कार्यक्रम एमएसएमई, टीडीसी पीपीडीसी, आग्राचे सहायक संचालक विकास वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. रामप्रताप झंवर हॉल, स्मॅक भवन येथे पार पडला.

यावेळी प्रशिक्षणार्थींनी प्रेझेंटेशन्स सादर केली.

कोपर्डे म्हणाले, या प्रशिक्षणाद्वारे आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे व क्षमता कशी अंगभूत केली पाहिजे हे आपण शिकलो आहोत. कोणतीही समस्या आल्यास आता आपल्याला सल्लागाराची आवश्यकता पडणार नाही. आपण स्वतः या समस्यांचे निराकरण करण्यास सक्षम झाला आहात.

विकास वर्मा म्हणाले, प्रशिक्षणार्थी ज्यावेळी कंपनीत जातील, त्यावेळी प्रशिक्षणादरम्यान शिकलेल्या ज्ञानाचा त्यांना नक्कीच फायदा होईल.

प्रतीक पराशर म्हणाले की, आपली कंपनी सर्वोत्तम होत, सुधारणा होण्यासाठी आपल्या मानसिकतेमध्ये बदल होणे गरजेचे आहे.

यावेळी स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील , सेमिनार कमिटी अध्यक्ष अमर जाधव, एमएसएमई टीडीसी पीपीडीसी आग्राचे फिल्ड ऑफिसर प्रतीक पराशर, जिल्हा समन्वयक विजय पवार, व्याख्याते सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्टधारक अभिजित कोपर्डे, प्रशिक्षणार्थी, उद्योजक, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी :स्मॅक व एमएसएमई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सिक्स सिग्मा प्रशिक्षण समारोपप्रसंगी स्मॅक अध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते विकास वर्मा यांचे स्वागत केले. यावेळी शेजारी अमर जाधव, प्रतीक पराशर, विजय पवार व इतर उपस्थित होते.

Web Title: Use of Six Sigma to solve problems in the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.