सामर्थ्याचा उपयोग ध्येय गाठण्यासाठी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:29 AM2021-01-16T04:29:12+5:302021-01-16T04:29:12+5:30
श्रीपतराव चौगुले आर्टस् अँड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली (ता. पन्हाळा) येथे इयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार ...
श्रीपतराव चौगुले आर्टस् अँड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली (ता. पन्हाळा) येथे इयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात पाटील बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के.एस. चौगुले होते. अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. चौगुले म्हणाले जीवनात ध्येयाशिवाय व कष्टाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. यावेळी जि.प. सदस्या कल्पनाताई चौगुले, एम. एस. चौगुले, सचिव शिवाजीराव पाटील, प्रकाश पाटील, श्रीमती वेदिका चौगुले, प्र. प्राचार्य डॉ. श्रीमती व्ही. पी. पाटील, डाॅ. श्रीमती उषा पवार, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती टी. के. पाटील, प्रा. विलास पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळ- श्रीपतराव चौगुले कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना डॉ. पी.एस. पाटील, डॉ. के. एस. चौगुले, जि.प. सदस्या कल्पनाताई चौगुले, शिवाजीराव पाटील आदी.