सामर्थ्यांचा उपयोग ध्येय गाठण्यासाठी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:23 AM2021-01-22T04:23:21+5:302021-01-22T04:23:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क करंजफेण - कोणतेही काम करत असताना तुम्ही नियोजन केले तर यशस्वी व्हाल. युवकाकडे अमर्यादित सामर्थ्य ...

Use strengths to achieve goals | सामर्थ्यांचा उपयोग ध्येय गाठण्यासाठी करा

सामर्थ्यांचा उपयोग ध्येय गाठण्यासाठी करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क करंजफेण - कोणतेही काम करत असताना तुम्ही नियोजन केले तर यशस्वी व्हाल. युवकाकडे अमर्यादित सामर्थ्य असते, त्याचा उपयोग ध्येय गाठण्यासाठी करावा. खचून न जाता ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर विश्वास ठेवून निस्वार्थ व प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. हिम्मत न हारता काम केले पाहिजे, हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. स्वप्नांचा पाठलाग केल्यास यशस्वी व्हाल व तुमचे कुटुंब आनंदी होईल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा.डॉ.पी.एस.पाटील यांनी केले. श्रीपतराव चौगुले आर्टस ॲण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी - कोतोली (ता.पन्हाळा) येथे इयत्ता १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात पाटील बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.के.एस. चौगुले होते. अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ.के.एस. चौगुले म्हणाले की, जीवनात ध्येयाशिवाय व कष्टाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. यावेळी जि.प.सदस्य कल्पना चौगुले, संस्था खजानीस मा. एम.एस. चौगुले ,सचिव शिवाजीराव पाटील, प्रकाश पाटील, श्रीमती वेदिका चौगुले, प्र. प्राचार्य डॉ. श्रीमती व्ही. पी. पाटील, डाॅ.श्रीमती उषा पवार , माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती टी. के. पाटील, प्रा.विलास पाटील आदि उपस्थित होते.

फोटो ओळ - श्रीपतराव चौगुले कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना डॉ.पी.एस.पाटील, डॉ. के. एस. चौगुले , जि.प.सदस्य कल्पनाताई चौगुले, शिवाजीराव पाटील आदि.

Web Title: Use strengths to achieve goals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.