कर्मचाऱ्यांचे युजर आयडी-पासवर्ड बंद, कोल्हापुरात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर लाल बावटा बांधकाम संघटनेची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 05:22 PM2023-07-20T17:22:42+5:302023-07-20T17:23:02+5:30

अन्यथा स्वातंत्रदिनी जिल्ह्यातील ४० हजार बांधकाम कामगार मोर्चाने बेमुदत महामुक्काम आंदोलनाचा इशारा

User ID password of employees banned, protest of Lal Bavata Construction Association in front of Assistant Labor Commissioner office in Kolhapur | कर्मचाऱ्यांचे युजर आयडी-पासवर्ड बंद, कोल्हापुरात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर लाल बावटा बांधकाम संघटनेची निदर्शने

कर्मचाऱ्यांचे युजर आयडी-पासवर्ड बंद, कोल्हापुरात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर लाल बावटा बांधकाम संघटनेची निदर्शने

googlenewsNext

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दीड महीन्यापासून कोल्हापूर आणि इचलकरंजी कार्यालयाकडील नोंदणी अधिकाऱ्यांचे तसेच कर्मचाऱ्यांचे युजर आयडी आणि पासवर्ड बंद केल्याने या कार्यालयातील कामकाज बंद आहे. या विरोधात लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या जिल्हा कमिटीने गुरुवारी शाहूपुरी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. 

कामगार कल्याणकारी मंडळाने दीड महिन्यापासून कोल्हापूर आणि इचलकरंजी कार्यालयाकडील नोंदणी अधिकाऱ्यांचे तसेच कर्मचाऱ्यांचे युजर आयडी आणि पासवर्ड बंद करून ते कामगार मंत्र्यांच्या सांगली जिल्ह्यात दिलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर व इचलकरंजी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कामकाज गेले दीड महिना ठप्प झाले आहे. यामुळे कामगारांच्यामध्ये फार मोठा उद्रेक निर्माण झाला आहे. 

कल्याणकारी मंडळ हे मंत्र्यांची मनधरणी करण्यासाठी इतर जिल्ह्यातील कार्यालयाकडील कामकाज दिड- दिड महीने बंद करून मंत्र्यांची मर्जी संभाळत आहे, हे निषेधार्ह आहे. त्यामुळे मंडळाने कोल्हापूर आणि इचलकरंजी कार्यालयाकडील नोंदणी, नुतनीकरण तसेच लाभाच्या अर्जांचा १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत १०० टक्के निपटारा करावा अशी मागणी सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या कार्यालयाकडील सर्व नोंदणी, नुतनीकरण आणि लाभाचे सर्वच अर्ज मंडळाने या कार्यालयात युजर आयडी व पासवर्डची संख्या वाढवुन १४ ऑगष्टपर्यंत १०० टक्के पुर्ण करावेत अन्यथा १५ ऑगष्ट रोजी स्वातंत्रदिनी जिल्ह्यातील ४० हजार बांधकाम कामगार मोर्चाने बेमुदत महामुक्काम आंदोलनाचा इशारा दिला.
                            
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, जिल्हा जनरल सेक्रेटरी शिवाजी मगदूम, प्रकाश कुंभार, संदीप सुतार, भगवानराव घोरपडे, विक्रम खतकर, शिवाजीराव मोरे, आनंदा कराडे, मनोहर सुतार, नुरमहमद बेळकुडे आदी उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या

  • आरोग्य तपासणीच्या नावाखाली नोंदीत बांधकाम कामगारांची तपासणी करून  रिपोर्ट न देणाऱ्या कंपनीचा ठेका रद्द करा.  त्याबदल्यात बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडिक्लेम योजना सुरू करा. 
  • मध्यान्ह भोजन योजना बंद करून कामगारांच्या खात्यावर महीना २ हजार रुपये द्या. तसेच मध्यान्ह भोजन योजनेची स्मार्ट कार्ड तालुकास्तरीय मेळावे घेऊन कामगारांना वाटप करा. 
  • घरकुल योजनेचे अर्ज मंजुर होऊनही त्यांचे अनुदान अध्याप खात्यावर वर्ग झाले नाही ते तात्काळ करावे, कार्यालयाकडे दाखल झालेले घरकुल योजनेचे अर्ज तातडीने मंजुर करावे. 
  • लाभाचे अर्ज मंजुरचे मेसेज येऊनही खात्यावर रक्कम जमा झाली नाही, त्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करून रक्कम कामगारांच्या खात्यावर जमा करावी.
  • कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण, व लाभाच्या अर्जाची तृटी आल्यास, ७ दिवसात तृटी अपडेट न केल्यास अर्ज रिजेक्ट होतो सदर अट तात्काळ रद्द करावी.
  • घरकुल योजनेमध्ये कामगाराच्या वडीलांच्या नावावर किंवा महीला कामगारांच्या सासऱ्याच्या नावावर जागा असल्यास समंती पत्रावर घरकुल मंजूर करावे. 
  • ग्रेस पिरेड मधील कामगारांना नैसर्गिक, अपघाती मृत्यू लाभ,देण्यात यावेत .

Web Title: User ID password of employees banned, protest of Lal Bavata Construction Association in front of Assistant Labor Commissioner office in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.