जनरल प्रॅक्टिशनरच्या उषा निंबाळकर नूतन अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:29+5:302021-04-02T04:25:29+5:30

कोल्हापूर : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जी.पी.ए)च्या अध्यक्षपदी डॉ. उषा निंबाळकर, सचिवपदी डॉ. महादेव जोगदंडे, तर खजानीस पदी डॉ. ...

Usha Nimbalkar new president of General Practitioner | जनरल प्रॅक्टिशनरच्या उषा निंबाळकर नूतन अध्यक्ष

जनरल प्रॅक्टिशनरच्या उषा निंबाळकर नूतन अध्यक्ष

googlenewsNext

कोल्हापूर : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जी.पी.ए)च्या अध्यक्षपदी डॉ. उषा निंबाळकर, सचिवपदी डॉ. महादेव जोगदंडे, तर खजानीस पदी डॉ. वर्षा पाटील यांची निवड झाली. कोल्हापूर शहरातील सुमारे तीनशेहून अधिक डॉक्टर्स या असोसिएशनचे सदस्य आहेत. ॲलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी अशा तिन्ही विद्याशाखांचे डॉक्टर्स या असोसिएशनचे सदस्य असून, रोटेशननुसार प्रतिवर्षी पदाधिकारी म्हणून संधी दिली जाते. वैद्यकीय व्यवसायातील अद्ययावत ज्ञान या व्यवसायिकांपर्यंत जावे यासाठी महिन्यातून एकदा चर्चासत्र आयोजित केले जाते. त्याशिवायही अन्य उपक्रम आयोजित केले जातात.

इतर कार्यकारिणी सदस्य असे : डॉ. शिरीष पाटील (माजी अध्यक्ष), डॉ. वीरेंद्र कानडीकर, डॉ. राजेश सातपुते, डॉ. अरुण धुमाळे, डॉ. रमेश जाधव, डॉ. शिवराज जितकर, डॉ. विनायक शिंदे, डॉ. राजेश कागले, डॉ. सचिन मुतालिक, डॉ. अजित कदम, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पूजा पाटील यांची निवड करण्यात आली. सल्लागार समितीमध्ये डॉ. शिवराज देसाई, डॉ. शिवपुत्र हिरेमठ, डॉ. उद्यम व्होरा यांचा समावेश करण्यात आला. तज्ज्ञ सल्लागार म्हणून डॉ. विलास महाजन यांची निवड झाली. या असोसिएशनची स्थापना डॉ. विनोद घोटगे यांनी केली असून, डॉक्टरांच्या विविध प्रश्नांवर असोसिएशन सक्रिय आहे.

फोटो : ०१०४२०२१-कोल-डॉ उषा निंबाळकर-निवड

डॉ. महादेव जोगदंडे-निवड

डॉ. वर्षा पाटील- निवड

Web Title: Usha Nimbalkar new president of General Practitioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.