घालवाडमध्ये ऊसपीक चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:05+5:302021-02-06T04:45:05+5:30

---------------- अर्जुनवाडमधील ‘तो’ रस्ता खराब अर्जुनवाड : अर्जुनवाड ते बिरोबा माळमार्गे शिरोळ हा रस्ता खराब झाल्याने या मार्गावर छोटे-मोठे ...

Uspik seminar in Ghalwad | घालवाडमध्ये ऊसपीक चर्चासत्र

घालवाडमध्ये ऊसपीक चर्चासत्र

Next

----------------

अर्जुनवाडमधील ‘तो’ रस्ता खराब

अर्जुनवाड : अर्जुनवाड ते बिरोबा माळमार्गे शिरोळ हा रस्ता खराब झाल्याने या मार्गावर छोटे-मोठे अपघात होत आहेत. या मार्गावरून ऊस वाहतूक होत असल्याने दुचाकीस्वारांना वाहतूक धोकादायक बनली आहे. तरी संबंधित विभागाने या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.

---------------

केशव राऊत यांची निवड

दानोळी : येथील जनसेवा कार्यकारी विविध सेवा सोसायटीचे सदस्य केशव राऊत यांची संजय गांधी निराधार योजनेच्या शिरोळ तालुका सदस्यपदी निवड झाली. यावेळी राऊत यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राम शिंदे, सीताराम माने, कुबेर केकले, स्वप्निल काटकर, विजय साळोखे, सचिन दळवी, संदीप काटकर, अशोक दळवी, नागेश कुंभोजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

-------------------

शिरढोणमध्ये बांधकाम संघटनेच्या शाखेचे उद्घाटन

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथे लाल बावटा शेतमजूर युनियनच्या लाला सेना बांधकाम कामगार संघटनेच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. युनियनचे किसान राज्य सरचिटणीस नामदेव गावडे यांच्या हस्ते शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन झाले. यावेळी युनियनच्या वतीने ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. हैदराबादअली मुजावर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद कोरबू, तेजस्विनी पाटील, डॉ. कुमार पाटील, महेश लोहार, अनिल दिवटे, रमजान मुजावर, शशिकांत सदलगे, सोहेल नदाफ उपस्थित होते.

------------------------------

....अन्यथा मंगळवारपासून बेमुदत उपोषण

जयसिंगपूर : शहरावर पडणाऱ्या राखेबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तातडीने कार्यवाही झाली नाही तर येत्या मंगळवारपासून (दि. ९) बेमुदत उपोषण करण्याचा इशारा आदम मुजावर यांनी दिला आहे. दरम्यान, मुजावर यांनी नगरपालिकेसमोर धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून शहराच्या सर्वच भागांवर राख पडत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप मुजावर यांनी केला आहे.

Web Title: Uspik seminar in Ghalwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.