कथाकथन स्पर्धेत उत्कर्ष शेंडगे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:05 AM2021-02-20T05:05:07+5:302021-02-20T05:05:07+5:30

इचलकरंजी : येथील आपटे वाचन मंदिरच्यावतीने इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शहर पातळीवरील कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये ४९ ...

Utkarsh Shendge came first in the storytelling competition | कथाकथन स्पर्धेत उत्कर्ष शेंडगे प्रथम

कथाकथन स्पर्धेत उत्कर्ष शेंडगे प्रथम

Next

इचलकरंजी : येथील आपटे वाचन मंदिरच्यावतीने इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शहर पातळीवरील कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये ४९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. सुरुवातीला रामभाऊ आपटे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. मोहन पुजारी यांनी केले.

स्पर्धेमध्ये उत्कर्ष आप्पासाहेब शेंडगे (डॉ. जया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्यामंदिर), अक्षरा विज्ञान उपाध्ये (गंगामाई विद्यामंदिर) व आराध्या सुजित सौंदत्तीकर (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वीतीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच महंमदजियान दावल मकानदार (बाळकृष्ण सांगले विद्यामंदिर) व अवनी भूषण फडके (गंगामाई विद्यामंदिर) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.

विजयी स्पर्धकांना पालिका शिक्षण विभागातील प्रशासनाधिकारी नम्रता गुरसाळे यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ॲड. स्वानंद कुलकर्णी यांनी स्वागत व राजेंद्र घोडके यांनी प्रास्ताविक केले. माया कुलकर्णी यांनी आभार मानले.

फोटो ओळी १८०२२०२१-आयसीएच-०२

इचलकरंजीत कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले.

Web Title: Utkarsh Shendge came first in the storytelling competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.