उत्तूर: महागोंड,वडक शिवालेत आठ बंद घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 08:44 PM2018-10-06T20:44:35+5:302018-10-06T20:46:14+5:30

महागोंड, वडक शिवाले (ता. आजरा) येथील रहदारीच्या ठिकाणचीआठ घरे चोरट्याने फोडली. महागोंड येथील गणपती होन्याळकर यांच्या घरातील दरवाजे उचकटून घरातील साहित्याची नासधूस करून अडीच तोळ्याचा सोन्याचा ऐवज

 Uttor: Mahagond, the waiter broke the eight closed houses in Shivaji | उत्तूर: महागोंड,वडक शिवालेत आठ बंद घरे फोडली

महागोंड ता. आजरा. येथील होन्याळकर यांच्या घरातील तिजोरीतील विस्कटलेले साहित्य.

Next

उत्तूर: महागोंड, वडक शिवाले (ता. आजरा) येथील रहदारीच्या ठिकाणचीआठ घरे चोरट्याने फोडली. महागोंड येथील गणपती होन्याळकर यांच्या घरातील दरवाजे उचकटून घरातील साहित्याची नासधूस करून अडीच तोळ्याचा सोन्याचा ऐवज चोरट्याने लंपास केला. याबाबतची फिर्याद विठाबाई गणपती होन्याळकर (रा. महागोंड, ता. आजरा)यांनी आजरा पोलिसांत दिली.

याबाबतचीअधिक माहिती अशी, विठाबाई होन्याळकर या तळघराला कुलूप लावून पहिल्या मजल्यावर होत्या. तर पती गणपती होन्याळकर शेताकडे गेले होते. शनिवारी पहाटे साडेपाच वाजता विठाबाई या तळघरात आल्या असता दरवाजा उचकटलेला दिसला. तिजोरी उचकटून सर्व कागदपत्रे अस्ताव्यस्त पसरले होते. त्यातील अडीच तोळ्यांचे गंठण, जोडवी, रोख १२०० रू. असा ऐवज लंपास केल्याचे त्यांना आढळले.

होन्याळकर यांच्या उजव्या बाजूस असलेल्या भिकाजी पाटील यांच्या घराचे कुलूपही चोरट्याने उचकटल्याचे, तसेच आनंदा देसाई यांच्या रामलता या बंगल्याचे दरवाजे उचकटून तेथील साहित्याची नासधूस केल्याचे ग्रामस्थांना आढळले. या दोन्ही घरांत काहीच न मिळाल्याने वझरे रस्त्याकडील संजय तुकाराम पाटील यांचेही बंद घर चोरट्यांनी फोडले. तेथेही त्यांच्या हाती काही लागले नाही.

यासह चोरट्यांनी वडक शिवाले येथील प्रकाश बापू घाटगे यांचे बंद घर फोडून तिजोरी उचकटली. शेवंता बाबू दळवी, बनाबाई रामचंद्र संकपाळ, पार्वती मारूती शिंदे यांची बंद घरेही फोडली. मात्र येथे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीधर जगताप , सहाय्यक फौजदार पांडूरंग दोरुगडे , हवालदार, विनायक दबडे, हवालदार वर्णे, सुधाकर हुले करीत आहेत.

दागिने बनवून वर्षही झालं नाही
पैशांची जमवा-जमव करून अडीच तोळ्यांचे गंठण बनवून वर्षही झालं नाही. तोवर ते चोरट्यांनी लंपास केले. धान्य उंदीर खातात म्हणून पहिल्या मजल्यावरील खोलीत गेले होते. तेथे गेलो नसतो तर दागिने वाचले असते, असे विठाबाई होन्याळकर यांनी सांगितले.
महागोंड ता. आजरा. येथील होन्याळकर यांच्या घरातील तिजोरीतील विस्कटलेले साहित्य.
 

Web Title:  Uttor: Mahagond, the waiter broke the eight closed houses in Shivaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.