महिला पोलिसांचा उतूरकरांनी घेतला धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:20 AM2021-06-04T04:20:01+5:302021-06-04T04:20:01+5:30
उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) येथे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होताना दिसत ...
उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) येथे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्याची वेळ ७ ते ११ असतानाही त्यानंतरही बंद न करता दुकाने सुरू होती. बाजारपेठेत विनामास्क व अत्यावश्यक सेवेत नसणारी दुकाने उघडली होती. त्यामुळे महिला पोलीस कर्मचारी यांनी धडक कारवाई केल्याने उत्तूरकरांनी धसका घेतला. दोन दिवसांत १७ हजाराचा दंड करण्यात वसूल करण्यात आला आहे. दुस-या लाटेत उत्तुरातील कोरोनाची संख्या शंभरीच्या पुढे गेली आहे. मृत्यूही झाले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. विनामास्क फिरणे, अत्यावश्यक सेवेत नसणारी दुकाने उघडणे, ७ ते ११ दुकाने सुरू करण्याचे आदेश असताना उशिरापर्यंत एक फळी उघडी करून दुकाने सुरू करणे, जेथे दुकाने उशिरा सुरू आहेत. त्या ठिकाणी महिला पोलीस जावून दंडात्मक पावत्या आकारत आहेत. त्या महिला पोलिसांचे कौतुकही उत्तूरकरांकडून होत आहे. हा सारा प्रकार कोरोनाला आंमत्रण देणारा ठरत असल्याने गेली दोन दिवस पोलीस उपनिरीक्षक बालाजी भांगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बी. एस. कोचरगी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस डी. जी. सावंत होमगार्डच्या मदतीने कारवाई करीत आहेत.
-------------------------
फोटो ओळी : उत्तूर (ता. आजरा) येथे विनामास्क फिरणा-या दुचाकीस्वाराला दंड आकारणी करताना पोलीस महिला कर्मचारी डी. जी. सावंत व होमगार्ड.
क्रमांक : ०३०६२०२१-गड-०४