शाळकरी मुलांंनी सुट्टीत लावली झाडे, अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:19 AM2019-04-22T11:19:52+5:302019-04-22T11:21:10+5:30

शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या बालसदस्यांनी उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी ‘झाडे लावा व आयुष्य वाढवा,’ हा अभिनव उपक्रम रविवारपासून सुरू केला. या उपक्रमांतर्गत त्यांनी २० झाडे लावून ती जतन करण्याचा निर्धारही केला आहे.

Vacant plants, innovative ventures for school children | शाळकरी मुलांंनी सुट्टीत लावली झाडे, अभिनव उपक्रम

कोल्हापुरातील शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या सदस्यांनी ‘झाडे लावा व आयुष्य वाढवा’ हा अभिनव उपक्रम रविवारपासून सुरू केला.

googlenewsNext
ठळक मुद्देशाळकरी मुलांंनी सुट्टीत लावली झाडेझाडे लावा-आयुष्य वाढवाचा नारा

कोल्हापूर : शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या बालसदस्यांनी उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी ‘झाडे लावा व आयुष्य वाढवा,’ हा अभिनव उपक्रम रविवारपासून सुरू केला. या उपक्रमांतर्गत त्यांनी २० झाडे लावून ती जतन करण्याचा निर्धारही केला आहे.

जुना बुधवार पेठ उपविभागीय पोलीस कार्यालय येथील मैदानावर हे वृक्षारोपण करण्यात आले. या २० झाडांची निगा राखण्यासाठी झाडांसभोवती या मुलांनी कुंपण घातले. कुंपणासाठीच्या काठ्या मुलांनी स्मशानभूमीतून आणून त्यापासून कुंपण केले.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उपक्रमात चिन्मय स्वामी, ओम स्वामी, रुद्र स्वामी, शिवतेज यादव, विश्वराज पाटील, परवेज मुल्ला, अथर्व मोतीपुरे, सुमित जाधव, शौर्य जाधव, मयूर सुतार, ऋषी सुतार, हर्षद डफळे, ऋतू कदम, रणवीर कदम, यशराज अधिक, सूर्यादित्य कदम, प्रसाद पाटील, संग्राम शिंदे या बालसवंगड्यांचा सहभाग होता. त्यांना उदय भोसले, कुणाल भोसले, रणजित भोसले, रणजित कदम, विजय चव्हाण, विजय खोत, पिंटू स्वामी, रविराज भोसले, अजिंक्य भोसले, रोहित पाटील, आदींनी सहकार्य केले.

 

Web Title: Vacant plants, innovative ventures for school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.