नागरी बँकांच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:40+5:302021-05-29T04:18:40+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष निपुण ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष निपुण काेरे यांनी पत्रकातून केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात हजारोजण बाधित आहेत. लॉकडाऊनच्या काळात जनतेच्या सेवेसाठी बँकेचे कर्मचारी पुढे होते. त्यातून कर्मचारी मोठ्या प्रमाणात बाधित होत असून, अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत. बँक कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून जाहीर करून त्यांना प्राधान्याने लसीकरण द्यावे, याबाबत बँक्स असोसिएशनच्या सभेत चर्चा झाली. केंद्र सरकारच्या वित्त विभागाने बँकिंग सेवा ही अत्यावश्यक सेवा मान्य करून कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यास संबधितांना सूचना दिल्या आहेत.
मात्र, सध्या लसीचा तुटवडा आहे, लस उपलब्ध होईल, तशी कर्मचाऱ्यांना वयाची अट न घालता प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.