जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:23 AM2021-05-18T04:23:53+5:302021-05-18T04:23:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लसीकरण करा, अशी मागणी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लसीकरण करा, अशी मागणी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज युनियन व बँक एम्प्लॉईज युनियन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हा बँकेच्या १९१ शाखांमधून सुमारे १४०० कर्मचारी कार्यरत आहेत. रोज ग्राहकांशी संपर्क येत असल्याने जोखीम अधिक आहे. दुसऱ्या लाटेत अनेक कर्मचारी बाधित झाले आहेत. आतापर्यंत दुर्दैवाने सात कर्मचारी मयत झाले आहेत. रिझर्व्ह बँकेने बँक कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून जाहीर केले आहे. सध्या लसीकरण सुरू आहे, मात्र विविध कारणाने बँक कर्मचाऱ्यांना लस उपलब्ध होत नाही. दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत आहे. ही गंभीर बाब असून बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयाबरोबरच तालुक्याच्या ठिकाणी लसीकरणाचे कॅम्प सुरू करावेत, अशी मागणी दोन्ही कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे केली आहे.