सारस इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने कर्मचाऱ्यांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:14+5:302021-06-29T04:17:14+5:30
कोल्हापूर : सारस इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने कर्मचाऱ्यांना अस्टर आधार हॉस्पिटलमध्ये ‘स्पुतनिक -५’ लस देण्यात आली. सुमारे शंभर कर्मचाऱ्यांना ही लस ...
कोल्हापूर : सारस इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने कर्मचाऱ्यांना अस्टर आधार हॉस्पिटलमध्ये ‘स्पुतनिक -५’ लस देण्यात आली. सुमारे शंभर कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली. व्यवसाय जरी बंद असला तरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षासाठी सारस इलेक्ट्रॉनिक्सने हा उपक्रम राबविला आहे. कर्मचारी हे आपल्या कुटुंबातील आहेत, आतापर्यंत ग्राहकांचा विश्वास जपत प्रामाणिकपणे व्यवसाय करून यश मिळविले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. नागरिकांनीही मास्क, सॅनिटायझरसह लस घेणे गरजेचे आहे. लसीबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवता, लवकरात लवकर लस उपलब्ध होईल, ती घेऊन प्रशासनाला कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सारस इलेक्ट्रॉनिक्सच्या पार्टनर मुग्ध कुलकर्णी यांनी केले आहे.
फोटो ओळी : सारस इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण केले.
(फोटो-२८०६२०२१-कोल-सारस इलेक्ट्रॉनिक्स)