‘गोकुळ’च्या कर्मचाऱ्यांना लस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:42 AM2021-03-13T04:42:53+5:302021-03-13T04:42:53+5:30

भोगावती : कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून संकलन आणि वितरणाचे काम करणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधात्मक ...

Vaccinate Gokul employees | ‘गोकुळ’च्या कर्मचाऱ्यांना लस द्या

‘गोकुळ’च्या कर्मचाऱ्यांना लस द्या

Next

भोगावती :

कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून संकलन आणि वितरणाचे काम करणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्या, अशी मागणी ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक व माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी केली. घोटवडे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, जीवघेण्या कोरोना महामारीच्या काळात दूध संघ अडचणीत असताना कर्मचारी-अधिकाऱ्यांनी संघाच्या हितासाठी काम केले. ‘गोकुळ’कडे सुमारे दोन हजार कर्मचारी व अधिकारी आहेत. याशिवाय जिल्ह्यात चार हजार प्राथमिक दूध संस्था आहेत. चार हजार दूध संस्थेत वीस हजार कर्मचारी आहेत. शेकडो कोटींची उलाढाल प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या जिवावर होत असते. अनंत अडचणीशी सामना करत या कर्मचाऱ्यांनी संकलन व वितरणाचे काम केले आहे.

काही वेळेला गावातील स्थानिक कमिटीने गावाबाहेर राहण्यास सांगितले, पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्याचे उत्तरदायित्व म्हणून या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देणे गरजेचे आहे. सध्या ४५ वर्षांवरील विविध आजारांनी ग्रासलेल्या लोकांना, तर ६५ वर्षांवरील लोकांना लस दिली जात आहे. प्राथमिक संस्थेत काम करणाऱ्या लोकांना याचा लाभ होणार नाही.

यावेळी अभिषेक डोंगळे, माजी सरपंच हसन राऊत, राजेंद्र चौगले, सुहास डोंगळे, धनाजी बरगे, सर्जेराव कवडे, संजय तिबिले, मुकुंद पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Vaccinate Gokul employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.