परदेशात जाणाऱ्या १०१ विद्यार्थ्यांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:29 AM2021-06-09T04:29:23+5:302021-06-09T04:29:23+5:30
कोल्हापूर : परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या १०१ विद्यार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. त्यांचे सावित्रीबाई फुले रुग्णालय ...
कोल्हापूर : परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या १०१ विद्यार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. त्यांचे सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे लसीकरण झाले. आमदार ऋतुराज पाटील, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भेट दिली.
लसीकरण मोहिमेत शहरी ९३ आणि ग्रामीण आठ अशा एकूण १०१ विद्यार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. परदेशातील विद्यापीठामध्ये उच्चशिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे. अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जाऊ नये, यासाठी त्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जाते. आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना पत्र देऊन अशा विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याबाबत मागणी केली होती. यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या १०१ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
फोटो : ०८०६२०२१- कोल- भेट
कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयातील लसीकरण केंद्रास आमदार ऋतुराज पाटील, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भेट दिली.