शहरात १११४ जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:54+5:302021-06-06T04:17:54+5:30

कोल्हापूर : शहरात शनिवारी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर हॉस्पिटलमध्ये ६० वर्षांवरील १०२४ जणांना कोविशिल्ड, तर ९० ...

Vaccination of 1114 people in the city | शहरात १११४ जणांचे लसीकरण

शहरात १११४ जणांचे लसीकरण

Next

कोल्हापूर : शहरात शनिवारी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर हॉस्पिटलमध्ये ६० वर्षांवरील १०२४ जणांना कोविशिल्ड, तर ९० जणांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला. पहिला आणि दुसरा डोस असे एकूण एका दिवसांत १११४ जणांना लसीकरण करण्यात आले.

सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे ११९, फिरंगाई येथे ११६, राजारामपुरी येथे ११८, पंचगंगा येथे ७४, कसबा बावडा येथे ६४, महाडीक माळ येथे ३१, आयसोलेशनमध्ये ९४, फुलेवाडी येथे ७३, सदरबाजार १३६, सिद्धार्थनगर येथे ४१, मोरे मानेनगर येथे ९४ व सीपीआर हॉस्पिटलमध्ये १५४ इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरामध्ये आजअखेर १ लाख १८ हजार ६५१ इतक्या पात्र लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे तर, ४१ हजार २७७ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.

दरम्यान, कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांनी ८४ दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी आज, रविवारी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित रहावे. याकरिता पात्र लाभार्थींना संबंधित प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरून कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी आरोग्य केंद्रातून फोन येईल, त्यांनीच लसीकरणासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका आरोग्य प्रशासनाने केले आहे.

Web Title: Vaccination of 1114 people in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.