अंथरुणाला खिळलेल्या १२७ व्याधीग्रस्तांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:28 AM2021-08-14T04:28:38+5:302021-08-14T04:28:38+5:30
कोल्हापूर : महापालिका आरोग्य विभागातर्फे अंथरुणाला खिळलेल्या १२७ व्याधीग्रस्त नागरिकांचे शुक्रवारी घरी जाऊन लसीकरण करण्यात आले. सावित्रीबाई फुले ...
कोल्हापूर : महापालिका आरोग्य विभागातर्फे अंथरुणाला खिळलेल्या १२७ व्याधीग्रस्त नागरिकांचे शुक्रवारी घरी जाऊन लसीकरण करण्यात आले. सावित्रीबाई फुले प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातर्फे ४५ , राजारामपुरी एक, पंचगंगा हॉस्पिटल तीन, कसबा बावडा केंद्रातर्फे २४, महाडिक माळ नऊ, सदर बाजार नऊ व मोरे माने नगर येथे ३६ व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
शहरात १३२७ नागरिकांचे लसीकरण -
शुक्रवारी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हॅक्सिन डोसचे हेल्थ केअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर १० नागरिकांचे, १८ ते ४५ वर्षांपर्यंत २४३ नागरिकांचे, तर ४५ ते ६० वर्षांपर्यंत ८८५ नागरिकांचे व ६० वर्षांवरील १८९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
आज (शनिवारी) १८ वर्षे वयोगटावरील कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झाले आहेत, अशांना दुसरा डोस प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिध्दार्थ नगर, मोरे माने नगर, भगवान महावीर दवाखाना व कदमवाडी या केंद्रांवर देण्यात येणार आहे.