महापालिकेमार्फत १३५९ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:27 AM2021-08-12T04:27:04+5:302021-08-12T04:27:04+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून मंगळवारी १३५९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आज, बुधवारी फक्त कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून मंगळवारी १३५९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आज, बुधवारी फक्त कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस दिला जाणार आहे.
मंगळवारी १८ ते ४५ वर्षांपर्यंत ४३० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस ९१ व दुसरा डोस ३३९ नागरिकांना देण्यात आला.
४५ ते ६० वर्षांपर्यंत ५७७ नागरिकांचे ६० वर्षांवरील ३२५ नागरिकांचे तर फ्रन्टलाइन २७ वर्कर्सचे लसीकरण करण्यात आले. सर्वांचे मिळून १३५९ नागरिकांचे मंगळवारी लसीकरण करण्यात आले.
आज, बुधवारी १८ वर्षांवरील कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झाले आहेत, अशांना दुसरा डोस प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिद्धार्थ नगर, मोरेमाने नगर, भगवान महावीर दवाखाना व कदमवाडी या केंद्रावर दिला जाणार आहे.