Corona vaccine Kolhapur : महापालिकेतर्फे ६० वर्षांवरील १४६९ नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 01:06 PM2021-06-01T13:06:20+5:302021-06-01T13:09:26+5:30

Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे तसेच सीपीआर रुग्णालय येथे मिळून ६० वर्षांवरील १४६९ नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले, तर ९४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.

Vaccination of 1469 citizens above 60 years of age by NMC | Corona vaccine Kolhapur : महापालिकेतर्फे ६० वर्षांवरील १४६९ नागरिकांचे लसीकरण

Corona vaccine Kolhapur : महापालिकेतर्फे ६० वर्षांवरील १४६९ नागरिकांचे लसीकरण

Next
ठळक मुद्देमहापालिकेतर्फे ६० वर्षांवरील १४६९ नागरिकांचे लसीकरणआजअखेर ४५ वर्षावरील ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे तसेच सीपीआर रुग्णालय येथे मिळून ६० वर्षांवरील १४६९ नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले, तर ९४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.

प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे १२०, फिरंगाई येथे १३४, राजारामपुरी येथे १५९, पंचगंगा येथे १०९, कसबा बावडा येथे १००, महाडिक माळ येथे १७०, आयसोलेशन येथे १६२, फुलेवाडी येथे ९८, सदरबाजार येथे १९५, सिध्दार्थनगर येथे ४७, मोरे मानेनगर येथे ११० व सीपीआर हॉस्पिटल येथे १५९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

शहरामध्ये आतापर्यंत एक लाख १५ हजार ९३१ नागरिकांना पहिल्या डोसचे, तर ४० हजार ८६८ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. आजअखेर ४५ वर्षावरील ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

 मंगळवारी ४५ वर्षावरील कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसरा डोस घेण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित राहावयाचे आहे. याकरिता संबंधीतांना प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरून फोन येईल, त्यांनीच तसेच ८४ दिवस पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनीच संबंधीत लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Vaccination of 1469 citizens above 60 years of age by NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.