महापालिका हद्दीत १७१७ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:26 AM2021-04-20T04:26:20+5:302021-04-20T04:26:20+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सोमवारी महानगरपालिकेच्या ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांत, तसेच खासगी रुग्णालयांत मिळून १७१७ नागरिकांना लसीकरण ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सोमवारी महानगरपालिकेच्या ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांत, तसेच खासगी रुग्णालयांत मिळून १७१७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. दरम्यान, महापालिकेकडील कोविशिल्ड लसीचा साठा संपला असल्याने आज, मंगळवारी लस मिळणार नाही. मात्र कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असल्याने दुसरा डोस दिला जाणार आहे.
सोमवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे ७८, राजारामपुरी येथे २२४, पंचगंगा येथे १५४, कसबा बावडा येथे २६४, आयसोलेशन येथे ६५, केंद्र फुलेवाडी येथे ९०, सदरबाजार येथे ७५, सीपीआर येथे ३८३, तर खासगी रुग्णालयांमध्ये ३८४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
शहरात आजअखेर ९६ हजार १५३ नागरिकांना पहिल्या डोसचे, तर १२ हजार ४८५ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
कोविशिल्ड लस संपली असून आज, मंगळवारी कोणालाही लस दिली जाणार नाही. मात्र कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असल्याने सावित्रीबाई फुले रुग्णालय, राजारामपुरी, पंचगंगा, महाडिक माळ, सदरबाजार, आयसोलेशन, फुलेवाडी येथील केंद्रावर ती दिली जाणार आहे.