दिवसभरात महापालिकेमार्फत १९७९ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:25 AM2021-09-27T04:25:30+5:302021-09-27T04:25:30+5:30
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात अकरा नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरण केले जात आहे. रविवारी १९७९ नागरिकांना लस टोचण्यात आली. त्यामध्ये ...
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात अकरा नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरण केले जात आहे. रविवारी १९७९ नागरिकांना लस टोचण्यात आली. त्यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १६४३, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३३६ आहे.
आतापर्यंत तीन लाख ८३ हजार ७४४ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचली असून, त्यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २ लाख ५७ हजार ३९० इतकी आहे. यापुढील काळात लसीकरणाची गती वाढविण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करीत आहे. आज, सोमवारपासून त्याकरिता विशेष लसीकरण मोहीम हाती घेतली जात आहे. अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांना पहिला डोस लसीकरण केंद्रावरच नोंदणी करून दिला जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त रविकांत आडसुळे यांनी केली आहे.