३१० जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:27 AM2021-05-27T04:27:22+5:302021-05-27T04:27:22+5:30
कोल्हापूर : शहरातील चार प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात एकूण ३१० जणांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र ...
कोल्हापूर : शहरातील चार प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात एकूण ३१० जणांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे ३३, राजारामपुरी येथे आठ, आयसोलेशन येथे सहा व सदरबाजार येथे २६३ जणांनी लस घेतली.
शहरात आज अखेर १ लाख १३ हजार ९४८ इतक्या पात्र लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे तर ४० हजार ५२२ जणांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. दरम्यान, २७ मेला कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहावयाचे आहे. यासाठी पात्र लाभार्थींना संबंधित प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरून फोन येईल, त्यांनीच व ८४ दिवस पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनीच संबंधित केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका आरोग्य प्रशासनाने केले आहे.