शहरातील तीन हजार ९७० जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:28 AM2021-08-24T04:28:30+5:302021-08-24T04:28:30+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांत सोमवारी कोविशिल्डचे ३ हजार ९७० जणांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये आरोग्य कर्मचारी ...
कोल्हापूर : महापालिकेच्या ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांत सोमवारी कोविशिल्डचे ३ हजार ९७० जणांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये आरोग्य कर्मचारी दोन आणि १८ ते ४५ वयोगटातील ३ हजार २००, ४५ ते ६० वर्षांपर्यंतच्या ५२३, तर ६० वर्षांवरील २४५ जणांचे लसीकरण करण्यात आले. अंथरुणाला खिळून असलेल्या २८ व्याधिग्रस्तांनाही लस देण्यात आली.
अंथरुणावरून खाली उतरू शकत नाहीत, अशा व्याधिग्रस्तांना घरी जाऊन महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र आयसोलेशन येथे १९, मोरे मानेनगर येथे ९ व्याधिग्रस्तांना लसीकरण करण्यात आले. आज, मंगळवारी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येणार आहे. यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी पहिल्या डोसच्या लसीकरणासाठी कोवीन पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केली आहे, त्यांनीच महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.