एका दिवसात महापालिकेतर्फे ५७८५ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:28 AM2021-09-04T04:28:53+5:302021-09-04T04:28:53+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून शुक्रवारी कोविशिल्डचे ५७८५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये हेल्थ केअर वर्कर व ...
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून शुक्रवारी कोविशिल्डचे ५७८५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर १६, तसेच १८ ते ४५ वर्षांपर्यंत ३९८९ नागरिकांचा समावेश आहे, तर ४५ ते ६० वर्षांपर्यंत १२३३ नागरिकांचा व ६० वर्षांवरील ५४७ नागरिकांचा त्यामध्ये समावेश आहे.
आज, शनिवारी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस, तर १८ वर्षांवरील कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी पहिल्या डोसच्या लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर ऑनलाईन रजिस्टेशन केले आहे त्यांनीच महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडे लसीकरण करण्यासाठी यावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.