कोल्हापूर शहरात ६२५ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:18 AM2021-06-28T04:18:03+5:302021-06-28T04:18:03+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात रविवारी दोन प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये ६० वर्षांवरील १४ नागरीकांना कोविशिल्डचा पहिला डोस व ...
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात रविवारी दोन प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये ६० वर्षांवरील १४ नागरीकांना कोविशिल्डचा पहिला डोस व ४५ वर्षांवरील ६११ नागरीकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला.
यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र पंचगंगा येथे ३३० व सदरबाजार येथे २९५ इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरात आतापर्यंत एक लाख २५ हजार ३१४ नागरीकांना पहिल्या डोसचे तर ४९ हजार ८७३ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
परदेशात जाणारे विद्यार्थी व दिव्यांग नागरिकांना सावित्रीबाई फुले येथे लसीकरण करण्यात येणार असून पात्र विद्यार्थ्यांनी आज, सोमवारी सकाळी ९ ते २ या वेळेत व दिव्यांग नागरिकांनी दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत लसीकरणासाठी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे आवश्यक ते कागदपत्रासह उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.