शाहूवाडी तालुक्यात ७० हजार नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:17 AM2021-07-02T04:17:13+5:302021-07-02T04:17:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : शाहूवाडीत तालुक्यात आरोग्य विभागाच्या दहा लसीकरण केंद्रांतर्गत ७० हजार ८१६ नागरिकांचे लसीकरण पूर्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शाहूवाडीत तालुक्यात आरोग्य विभागाच्या दहा लसीकरण केंद्रांतर्गत ७० हजार ८१६ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तालुक्यात ७४ टक्के लसीकरणाचे काम झाले. पंधरा दिवसांत १२ हजार नागरिकांचे स्वॅब तपासणी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. कोरोनाच्या साथीमुळे तालुक्यात ९२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
शाहूवाडी तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दररोज ५० ते ७० नागरिक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांची तपासणी घरो घरी जाऊन केली जात आहे. २३ हजार ७१९ नागरिकांचे स्वॅब तपासणी केली जाते. त्यामध्ये २ हजार ५६१ नागरिक पॉझिटिव्ह सापडले आहेत. ९२ नागरिकांचा कोरोनामुळे मुत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण ३.४ टक्के एवढे आहे. तालुक्यात बारा पथकांद्वारे नागरिकांची घरोघरी तपासणी करून स्वॅब घेतले जात आहेत. ७० हजार ८१६ नागरिकांचे लसीकरण केले आहे. ५५ हजार ४४३ नागरिकांनी पहिला कोरोनाचा डोस घेतला आहे. १५ हजार ३७३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
तालुक्यात तीन केविड सेंटर असून येथे १ हजार १४६ नागरिकांवर कोरोनाचे उपचार केले आहेत. २ हजार ५६१ नागरिक पॉझिटिव्ह झाले होते. त्यांच्या वर कोविड सेंटरमध्ये उपचार केल्यामुळे २ हजार ०५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तालुक्यात दिलासादायक बाब म्हणजे १३३ गावांपैकी ११७ गावांमध्ये कोरोनामुळे कोणाला जीव गमवावा लागलेला नाही. मलकापूर, हणमंतवाडी, शित्तूर वारुण, शाहूवाडी, मलकापूर, चरण, सरुड, भेडसगाव, माणगाव, बांबवडे, थेरगाव, कापशी, विरळे ही गावे पहिल्या लाटेत हॉटस्पॉट होती. तर घोळसवडे, सावर्ड, म्हाळसवडे या गावांत कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.
दुसऱ्या लाटेत ११७ गावांमध्ये १८०० कोरोनाबधित रुग्ण आढळले असून, कुटुंबाची काळजी घ्यावी, प्रशासनास सहकार्य करावे.
डॉ. एच. आर. निरंकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, शाहूवाडी