महापालिका हद्दीत ७०६ नागरिकांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:07+5:302021-06-16T04:31:07+5:30

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने मंगळवारी शहरातील दहा प्राथिमक नागरी आरोग्य केंद्र तसेच सीपीआर रुग्णालय येथे ६० वर्षांवरील ३९८ नागरिकांना ...

Vaccination of 706 citizens within the municipal limits | महापालिका हद्दीत ७०६ नागरिकांना लसीकरण

महापालिका हद्दीत ७०६ नागरिकांना लसीकरण

Next

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने मंगळवारी शहरातील दहा प्राथिमक नागरी आरोग्य केंद्र तसेच सीपीआर रुग्णालय येथे ६० वर्षांवरील ३९८ नागरिकांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस तर, ३०८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.

शहरामध्ये पहिला व दुसरा डोस मिळून ७०६ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये सावित्रीबाई फुले येथे ७८, फिरंगाई येथे ८२, राजारामपुरी १०४, पंचगंगा ३२ , महाडिक माळ ५५, आयसोलेशन ६१, फुलेवाडी ५९, सदरबाजार ३०, सिद्धार्थनगर १०, मोरे मानेनगर ३४ व सीपीआर हॉस्पिटल येथे १६१ इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरात आतापर्यंत एक लाख २३ हजार ४८७ नागरिकांना पहिल्या डोसचे तर, ४३ हजार ६९९ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.

Web Title: Vaccination of 706 citizens within the municipal limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.