मनपाच्या वतीने ७५५ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:26+5:302021-06-09T04:28:26+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वतीने शहरात नागरी आरोग्य केंद्र आणि सीपीआर रुग्णालय यांच्यामार्फत ६० वर्षांवरील ५८८ नागरिकांना कोविशिल्ड ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वतीने शहरात नागरी आरोग्य केंद्र आणि सीपीआर रुग्णालय यांच्यामार्फत ६० वर्षांवरील ५८८ नागरिकांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस तर, १६७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.
कोल्हापूर शहरात पहिला व दुसरा डोस मिळून ७५५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे १०१, फिरंगाई येथे ८५, राजारामपुरी येथे ३१, पंचगंगा येथे ६८, कसबा बावडा येथे ७२, महाडिक माळ येथे १०, फुलेवाडी येथे ६६, सदरबाजार येथे ९२, सिद्धार्थनगर येथे ७२ व सीपीआर हॉस्पिटल येथे १५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत एक लाख १९ हजार ५६४ नागरिकांना पहिल्या डोसचे तर, ४१ हजार ४९० नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.