फुलेवाडी आरोग्य केंद्रात ८३३ ज्येष्ठांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:41+5:302021-06-16T04:31:41+5:30
२९ एप्रिलपासून या केंद्रावर ४५ वर्षांवरील पहिला डोस देणे बंद होते. त्यानंतर येथे कोव्हॅक्सिन व कोव्हीशिल्डचा दुसरे ...
२९ एप्रिलपासून या केंद्रावर ४५ वर्षांवरील पहिला डोस देणे बंद होते. त्यानंतर येथे कोव्हॅक्सिन व कोव्हीशिल्डचा दुसरे डोस देण्यास सुरू होते. दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचे केल्याने या केंद्रावर १३ मेपासून दुसरा डोसही मिळणे बंद झाले होते. आता फक्त ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचा पहिला डोस राहिला असलेस किंवा दुसरा राहिला असल्यास उपलब्ध केला आहे.
फुलेवाडी नागरी केंद्रावर आजपर्यंत नागरिकांना कोव्हिशिल्डचे ८४५० तर कोव्हॅक्सिनचे ६७० डोस दिले गेले. ४५ वर्षावरील काहीना अद्याप पहिला डोस मिळालेला नाही तर १८ वर्षांवरील तरुणांना पहिल्या डोसची प्रतीक्षा लागली असून लस कधी उपलब्ध होणार, अशी विचारणा तरुणांसह नागरिकांडून केंद्रासह आशा वर्करना सातत्याने होत आहे.