झोपडपट्टीतील ८५ नागरिकांचे लसीकरण, जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:28 AM2021-08-13T04:28:53+5:302021-08-13T04:28:53+5:30
कोल्हापूर : महापालिका, शेल्टर संस्था व युनिसेफ इंडिया यांच्या माध्यमातून गुरुवारी कळंबा फिल्टर हाऊस येथील झोपडपट्टी भागातील ८५ नागरिकांना ...
कोल्हापूर : महापालिका, शेल्टर संस्था व युनिसेफ इंडिया यांच्या माध्यमातून गुरुवारी कळंबा फिल्टर हाऊस येथील झोपडपट्टी भागातील ८५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. या लसीकरण जागृती आणि प्रदान मोहिमेचे उद्घाटन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपआयुक्त निखिल मोरे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. अमोल माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्पिता खैरमोडे, माजी नगरसेविका वृषाली कदम, शेल्टर असोसिएटस संस्थेचे प्रमुख प्रतिमा जोशी, प्रकल्प संचालिका स्मिता काळे, दुर्वास कदम, आनंद बेडेकर उपस्थित होते.
शहरी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोना आजार आणि कोरोनावरील लससंदर्भात अनेक संभ्रम आहेत. त्यामुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांचे लस घेण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे शेल्टर असोसिएट्स संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. या संस्थेने महानगरपालिकेच्या सहकार्याने झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांसाठी लस उपलब्ध करून देत आहे. यावेळी पथनाट्य, लसीकरणसंदर्भात गाणी, पपेट शो, सापशिडी, चालता बोलता आदी खेळ-कार्यक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली.
फोटो क्रमांक - १२०८२०२१-कोल-केएमसी०१
ओळ - कोल्हापूर महापालिका, शेल्टर संस्था व युनिसेफ इंडिया यांच्या माध्यमातून गुरुवारी लसीकरण जागृती आणि प्रदान मोहिमेचे उद्घाटन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते झाले.