शहरात ९६९ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:29 AM2021-06-09T04:29:25+5:302021-06-09T04:29:25+5:30
कोल्हापूर : शहरातील आठ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर रुग्णालयात ६० वर्षांवरील ५५१ नागरिकांना कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचा पहिला ...
कोल्हापूर : शहरातील आठ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर रुग्णालयात ६० वर्षांवरील ५५१ नागरिकांना कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला. ४१८ जणांना दुसरा डोस देण्यात आला. पहिला आणि दुसरा डोस मिळून एकूण ९६९ जणांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे १०९, फिरंगाई येथे १११, राजारामपुरी येथे ६९, महाडिक माळ येथे २२८, आयसोलेशन येथे ६०, फुलेवाडी येथे ६३, सदरबाजार येथे ७४, सिद्धार्थनगर येथे ४७ व सीपीआर रुग्णालयात २०८ इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसऱ्या डोससाठी ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत, अशा नागरिकांनी आज, बुधवारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.