शहरात मंगळवारी ९९८ नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:24 AM2021-04-21T04:24:55+5:302021-04-21T04:24:55+5:30

कोल्हापूर : शहरात मंगळवारी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व खासगी हॉस्पिटलमध्ये ९९८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये सावित्रीबाई ...

Vaccination of 998 citizens in the city on Tuesday | शहरात मंगळवारी ९९८ नागरिकांचे लसीकरण

शहरात मंगळवारी ९९८ नागरिकांचे लसीकरण

Next

कोल्हापूर : शहरात मंगळवारी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व खासगी हॉस्पिटलमध्ये ९९८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

यामध्ये सावित्रीबाई फुले केंद्रावर २३, राजारामपुरीत ६२, पंचगंगा येथे ३६, कसबा बावडा येथे ४०, महाडिक माळ ४०, आयसोलेशन ५३, फुलेवाडी येथे १९५, सदरबाजार ३१, सीपीआर ३१७ व खासगी हॉस्पिटलमध्ये २०१ इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

शहरात आजवर ९६ हजार ५०३ जणांना पहिला डोस तर १३ हजार १३३ जणांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. तर ४५ वर्षावरील ४२ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

आज बुधवारी वरील केंद्रात कोव्हॅक्सिन दुसरा डोसचे लसीकरण सुरू राहील. सीपीआर हॉस्पिटल येथे कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस तसेच कोव्हॅक्सिन दुसऱ्या डोसचे लसीकरण चालू राहणार आहे. यासह कोल्हापूर इस्टिट्युट ऑफ आर्थोपेडिक ॲन्ड ट्रोमा, डॉ.डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, जोशी हॉस्पिटल व डायलेसिस सेंटर, ओमसाई अँकोलॉजी हॉस्पिटल, ॲस्टर आधार हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल येथेही लसीकरण सुरू असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

---

Web Title: Vaccination of 998 citizens in the city on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.