गडहिंग्लजमध्ये प्राथमिक उपकेंद्रांवरही लसीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:25 AM2021-04-07T04:25:44+5:302021-04-07T04:25:44+5:30

शिवानंद पाटील गडहिंग्लज : कोविड लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३५ पैकी २० ...

Vaccination also started at primary substations in Gadhinglaj | गडहिंग्लजमध्ये प्राथमिक उपकेंद्रांवरही लसीकरण सुरू

गडहिंग्लजमध्ये प्राथमिक उपकेंद्रांवरही लसीकरण सुरू

Next

शिवानंद पाटील

गडहिंग्लज : कोविड लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३५ पैकी २० उपकेंद्रांवरदेखील सोमवारपासून लसीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे ९० गावांतील ३९४८३ लसीकरण पात्र लाभार्थींची सोय झाली आहे.

उपकेंद्राचे नाव व त्याला जोडलेली गावे कंसात - हलकर्णी (कुंबळहाळ, इदरगुच्ची, हलकर्णी), अरळगुंडी (अरळगुंडी, हलकर्णी), बसर्गे (बसर्गे, येणेचवंडी, चंदनकुड) तेरणी (तेरणी, कळविकट्टी, बुगडीकट्टी, तेगिनहाळ), हिडदुगी (हिडदुगी, कडाल, हसूरसासगिरी, हसूरवाडी) नरेवाडी (नरेवाडी, तुप्पूरवाडी, मनवाड, नंदनवाड, नौकूड), नूल (नूल), जरळी (जरळी, मुगळी, शिंदेवाडी),

चन्नेकुप्पी (चन्नेकुप्पी, खमलेहट्टी, तनवडी, हणमंतवाडी, चिंचेवाडी, भडगाव) हेब्बाळ कानूल (हेब्बाळ), निलजी (निलजी), मुत्नाळ (हिटणी, मुत्नाळ), खणदाळ (खणदाळ, नांगनूर) कानडेवाडी (कानडेवाडी) ग्रामीण रुग्णालय नेसरी (नेसरी, तळेवाडी, तारेवाडी), उपकेंद्र कानडेवाडी (सरोळी, गावठाण, अर्जुनवाडी), उपकेंद्र वाघराळी (वाघराळी, बिद्रेवाडी), बटकणंगले (बटकणंगले, शिप्पूर तर्फ नेसरी, हेळेवाडी) मुंगूरवाडी (मुंगूरवाडी, जांभूळवाडी, दुग्गूनवाडी, मासेवाडी, मांगनूर तर्फ सावतवाडी), हेब्बाळ जलद्याळ (हेब्बाळ जलद्याळ, लिंगनूर), हडलगे (हडलगे, तावरेवाडी, डोणेवाडी), सांबरे (सांबरे, कुमरी, काळमवाडी, यमेहट्टी) महागाव (महागाव, उंबरवाडी), हरळी खुर्द (हरळी खुर्द, हरळी बुद्रुक, वैरागवाडी, हुनगिनहाळ), इंचनाळ (इंचनाळ, बेळगुंदी, ऐनापूर), कौलगे (कौलगे, हिरलगे)

कडगाव (कडगाव, जखेवाडी, बेकनाळ, लिंगनूर), गिजवणे (गिजवणे), करंबळी (करंबळी, शिप्पूर), अत्याळ (अत्याळ), वडरगे (वडरगे) औरनाळ (औरनाळ, बड्याचीवाडी), हनिमनाळ (हनिमनाळ, शेंद्री), दुंडगे (दुंडगे, माद्याळ, हसूरचंपू).

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील हलकर्णी, नूल, कानडेवाडी, मुंगूरवाडी, महागाव व कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रांवरही लसीकरणाची सोय झाल्यामुळे ग्रामीण नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

-------------------------------------

* फोटो ओळी : हेब्बाळ जलद्याळ (ता. गडहिंग्लज) येथील लसीकरण केंद्राचे उद्घाटन पं. स. सदस्या इंदू नाईक यांच्याहस्ते फित कापून झाले. यावेळी सरपंच कविता चव्हाण, उपसरपंच दिग्विजय गुरव यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशासेविका उपस्थित होत्या.

क्रमांक : ०६०४२०२१-गड-०७

Web Title: Vaccination also started at primary substations in Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.