सिमंधरतर्फे उद्यापासून लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:22 AM2021-04-11T04:22:20+5:302021-04-11T04:22:20+5:30
कोल्हापूर : सिमंधर कोविड केअर केंद्राच्या वतीने उद्या सोमवारपासून शिरोली- सांगली फाटा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ...
कोल्हापूर : सिमंधर कोविड केअर केंद्राच्या वतीने उद्या सोमवारपासून शिरोली- सांगली फाटा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याचे उद्घाटन सकाळी १० वाजता आमदार ऋतुराज पाटील व आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या हस्ते होईल. यावेळी डॉ. सुहास कोरे, स्मॅक अध्यक्ष अतुल पाटील, ट्रस्ट अध्यक्ष दिलीप गांधी उपस्थित असतील. या केंद्राचा लाभ औद्योगिक वसाहत परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे.
शासनाने नियम व अटी घालून औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना परवानगी दिल्याने कोरोनाकाळातही कोल्हापूर परिसरातील हजारो कामगार शिरोली, तसेच अन्य औद्योगिक वसाहतींमध्ये कामाला जातात. या कामगारांचे लसीकरण करण्याबाबतच्या सूचना शासनाकडून उद्योग क्षेत्राला देण्यात आल्या आहेत. याचा विचार करून कामगारांना कामाच्या परिसरातच लस उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिमंधर कोविड केअर येथे ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.
---