शिरोळ तालुक्यात लसीकरण मोहीम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:24+5:302021-04-29T04:18:24+5:30
शिरोळ तालुक्यात ४६ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून लसीच्या उपलब्धतेनुसार दैनंदिन केंद्रे सुरू ठेवली जात ...
शिरोळ तालुक्यात ४६ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून लसीच्या उपलब्धतेनुसार दैनंदिन केंद्रे सुरू ठेवली जात आहेत. सध्या ४५ वयोगटावरील नागरिकांना लसीकरण करण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालयात लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती. नागरिक देखील त्याला प्रतिसाद देत होते. पण अनेकांना लसीचा साठा संपल्याची माहिती नसल्याने, बुधवारी केंद्रावरून लस न घेताच परतावे लागले. आरोग्य विभागाने शासनाकडे लसीची मागणी केली आहे. साठा उपलब्ध होताच पुन्हा युध्दपातळीवर लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार यांनी दिली.
फोटो - २८०४२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ -
शिरोळ येथे कोविड लस संपली असल्याने केंद्राबाहेर अशाप्रकारे फलक लावण्यात आला होता. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)