बालकल्याणच्या कर्मचाऱ्यांचे युद्धपातळीवर लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:24 AM2021-05-18T04:24:24+5:302021-05-18T04:24:24+5:30

कोल्हापूर : येथील बालकल्याण संकुलातील मुलांना कोरोनाची बाधा झाल्याने संस्थेतील सर्व ८४ कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी युद्धपातळीवर यंत्रणा ...

Vaccination of child welfare workers on the battlefield | बालकल्याणच्या कर्मचाऱ्यांचे युद्धपातळीवर लसीकरण

बालकल्याणच्या कर्मचाऱ्यांचे युद्धपातळीवर लसीकरण

Next

कोल्हापूर : येथील बालकल्याण संकुलातील मुलांना कोरोनाची बाधा झाल्याने संस्थेतील सर्व ८४ कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी युद्धपातळीवर यंत्रणा राबवून सोमवारी लसीकरण केले. कोरोनाबाधित झालेली ४७ मुले व सहा कर्मचारी विद्यापीठातील कोविड केंद्रात असून त्यांची प्रकृती चांगली आहे. दहा दिवसांनंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

संकुलातील मुलांना संसर्ग झाल्याने जिल्हा प्रशासनही हादरले. कारण जिल्हाधिकारी हेच संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी लक्ष घालून अन्य मुलांना संसर्ग होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मदतीने सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्यात आले. कोरोनाबाधित असलेली मुले कोविड केंद्रात विलगीकरणात आहेत. त्यांना बैठ्या खेळाचे साहित्य पुरवण्यात आले आहे. काही मुले उत्तम चित्रे काढत आहेत. संस्थेचे दोन कर्मचारी व मानद कार्यवाह पद्मा तिवले या रोज तिथे जावून मुलांची मायेने देखभाल पाहतात. त्यांच्या आहाराकडेही लक्ष दिले जाते. महापालिका यंत्रणेचेही फारच चांगले सहकार्य लाभल्याचे तिवले यांनी सांगितले.

Web Title: Vaccination of child welfare workers on the battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.