कोडोली येथे दिव्यांग बांधवांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:18+5:302021-06-22T04:17:18+5:30
१८ ते ४४ वयोगटातील दिव्यांग बांधवांना प्रत्येक सोमवारी लस देण्यात येणार असल्याचे प्रभारी अधीक्षक डॉ. खाबडे यांनी ...
१८ ते ४४ वयोगटातील दिव्यांग बांधवांना प्रत्येक सोमवारी लस देण्यात येणार असल्याचे प्रभारी अधीक्षक डॉ. खाबडे यांनी सांगितले. निर्माण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिव्यांग बांधवांमध्ये लस घेण्याबाबत चांगल्या प्रकारे जनजागृती केली होती. दिव्यांग बांधवांच्या सोयीसाठी येथे झेरॉक्स मशीनची सोय केली होती. या लसीकरणासाठी काखे, मोहरे, केखले, सातवे पोखले इत्यादी गावतील दिव्यांग बांधव उपस्थित होते. या दिव्यांग बांधवांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य विशांत महापुरे, जयदीप पाटील, राजर्षी शाहू महाराज दिव्यांग संघटना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अविनाश केकरे, सतीश जाधव, शिवाजी साळुंखे, संदीप किबीले, उमेश घाटगे, भारत दुर्गाडे, सचिन दाभाडे उपस्थित होते. या लसीकरणात प्रभारी अधीक्षक डॉ. डी. एल. खाबडे, सुनील पाटील व सिस्टर घारगे यांनी काम पाहिले.