आणखी चार खासगी रुग्णालयांत लसीकरणाची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:28 AM2021-03-09T04:28:28+5:302021-03-09T04:28:28+5:30
कोल्हापूर : शहरातील आणखीन चार खासगी रुग्णालयांत कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयांत अडीचशे रुपये नाममात्र शुल्क ...
कोल्हापूर : शहरातील आणखीन चार खासगी रुग्णालयांत कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयांत अडीचशे रुपये नाममात्र शुल्क आकारून लसीकरण होईल.
मगदूम हॉस्पिटल, सिध्दिविनायक हार्ट हॉस्पिटल, ओम साई हॉस्पिटल, कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ अर्थ ॲण्ड ट्राॅमा हॉस्पिटल या चार रुग्णालयांत सोमवारपासून लसीकरण सुरू करण्यात आले. दि. १ मार्चपासून शहरातील खासगी व्यावसायिक केपीसी हॉस्पिटल, ॲपल हॉस्पिटल, डायमंड हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सिध्दिविनायक हॉस्पिटल या ५ मुख्य हॉस्पिटलमध्ये प्राथमिक स्तरावर कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
शनिवारअखेर ८९६८ आरोग्य कर्मचारी, ३६६१ मनपा फ्रंन्टलाईन कर्मचारी, ४५ ते ५९ व्याधीग्रस्त ५७३, तसेच इतक्या ६० वर्षावरील ३६५५ नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले. तसेच ३१४५ आरोग्य कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
शहरातील नागरिकांचा कोविड लसीकरणाकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ही लस खासगी दवाखान्यामध्ये २५० रुपयात उपलब्ध असून महापालिकेच्या लसीकरण केद्रांमध्ये मोफत उपलब्ध आहे. पात्र लाभार्थ्यांनी आपले लसीकरण लवकर करून घ्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.