शहरात दिवसभरात पाच हजार नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:26 AM2021-04-23T04:26:12+5:302021-04-23T04:26:12+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतर्फे शहरातील अकरा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांसह खासगी रुग्णालयात गुरुवारी दिवसभरात ५,०२५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. ...

Vaccination of five thousand citizens in a day in the city | शहरात दिवसभरात पाच हजार नागरिकांचे लसीकरण

शहरात दिवसभरात पाच हजार नागरिकांचे लसीकरण

Next

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतर्फे शहरातील अकरा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांसह खासगी रुग्णालयात गुरुवारी दिवसभरात ५,०२५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. लसीचा पुरवठा कमी आणि मागणी अधिक यामुळे अनेक ठिकाणी वादावादी सह सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

दिवसभरात सावित्रीबाई फुले रुग्णालय (३०५), फिरंगाई आरोग्य केंद्र (२५६), राजारामपुरी आरोग्य केंद्र (१८७),पंचगंगा आरोग्य केंद्र (३५१), कसबा बावडा प्राथमिक नागरी केंद्र (५४८), महाडीक माळ (९८४),आयसोलेशन (३७४), फुलेवाडी (१३३), सदरबाजार (५७७), सिद्धार्थनगर (२९७), मोरे-मानेनगर (१४३), सीपीआर रुग्णालय (३८३) व उर्वरित खासगी रुग्णालयातून ५०७ असे ५ हजार २५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरात आतापर्यंत १ लाख २ हजार ४३४ पात्र लाभार्थ्यांनी पहिली लसीचा डोस, तर १६ हजार ५१४ इतक्या जणांनी दुसऱ्या लसीचा डोस घेतले आहे. आज अखेर ४५ वर्षांवरील ४५ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

आज कोविशिल्ड बंद, कोव्हॅक्सिनचा सुरु

उपलब्ध साठा पाहता आज,शुक्रवारी महापालिकेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्ड लस उपलब्ध नाही. त्यामुळे पहिला व दुसरा डोस लसीकरण बंद राहणार आहे. तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, कसबा बावडा, महाडीक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बजार, सिद्धार्थनगर, मोरे-मानेनगर येथे सुरु राहणार आहे. सीपीआर रुग्णालयात कोविशिल्ड पहिला व दुसरा डोस व कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस लसीकरण सुरु राहणार आहे. याशिवाय मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयामध्ये २५० रूपये भरून घेता येणार आहे. याची नोंद घ्यावी. असे आवाहन महापालिका प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

वादावादी अन् सोशल डिस्टन्सिंगचा फज्ज

शहरातील सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, महाडीक माळ, आयसोलेशन आदी ठिकाणी लसीचा साठा कमी होता आणि रांगेत उभा राहिलेल्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे वादावादीचे प्रसंग घडले. प्रसंगी पोलिसांना हस्तक्षेप करून वाद मिटवावे लागले. अनेकजण दोन ते तीन तास रांगेत उभारून ही लस न मिळाल्यामुळे संतप्त झाले होते. पंचगंगा केंद्रावर चेंगराचेंगरी आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

फोटो : २२०४२०२१-कोल-पंचगंगा हाॅस्पिटल

आेळी : शुक्रवार पेठेतील पंचगंगा आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गुरुवारी अशी झुंबड उडाली होती. यात वादावादी सह सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

Web Title: Vaccination of five thousand citizens in a day in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.