सुटीच्या तीन दिवसांत पाच हजार नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:25 AM2021-03-31T04:25:07+5:302021-03-31T04:25:07+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शनिवार ते सोमवार या तिन्ही सुटीच्या दिवशी एकूण ४९१३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, ...

Vaccination of five thousand citizens during the three days of the holiday | सुटीच्या तीन दिवसांत पाच हजार नागरिकांचे लसीकरण

सुटीच्या तीन दिवसांत पाच हजार नागरिकांचे लसीकरण

Next

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शनिवार ते सोमवार या तिन्ही सुटीच्या दिवशी एकूण ४९१३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर रोज सरासरी ८०० ते ९०० संशयित कोविड रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती महानगरपालिका सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रोज जेवढे रुग्ण आढळून येतात, त्यातील निम्मे रुग्ण हे महापालिका क्षेत्रातील आहेत. सध्या क्षेत्रात एकूण २३८ कोविडचे सक्रिय रुग्ण आहेत. मागील आठवड्यात महापालिकेतर्फे एकूण ५४५२ व्यक्तींची स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यामध्ये शहरातील रुग्णवाढीचा दर हा ३.४६ इतका आहे. सध्या राज्यात कोविड रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, ज्या नागरिकांना कोविडची लक्षणे आढळून येत आहेत, त्यांनी जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करण्याचे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

महानगरपालिका क्षेत्रात शनिवार ते सोमवार या तिन्ही सुटीच्या दिवशी एकूण ४९१३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. यात ६० वर्षांवरील नागरिक व ४५ ते ५९ वयातील व्याधिग्रस्त नागरिकांचा समावेश आहे. उद्या, गुरुवारपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. पात्र नागरिकांनी जवळच्या नागरी आरोग्य केंद्र अथवा खाजगी हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करून घेण्याचे आवाहन बलवकडे यांनी केले आहे.

Web Title: Vaccination of five thousand citizens during the three days of the holiday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.