कोरोनामुक्तीसाठी लसीकरण महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:16 AM2021-06-23T04:16:13+5:302021-06-23T04:16:13+5:30
कोपार्डे : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत १२ लाख ७२ हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले ...
कोपार्डे : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत १२ लाख ७२ हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात ३०४ केंद्रे तयार आहेत. कोल्हापूरमध्ये सध्या दिवसाला पन्नास हजार लसीकरण करण्याची क्षमता जिल्हा प्रशासनाची आहे. मात्र लस पुरवठा केंद्र सरकारच्या हातात असल्याने याचा परिणाम लसीकरणावर होत असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर महानगरपालिका आणि फाॅर्टीवनर क्लब ऑफ कोल्हापूर या संस्थेच्या सहकार्याने लक्षतीर्थ वसाहत येथे ३० बेडचे लहान मुलांसाठीच्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
फॉर्टीवनर क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष उत्तम फराकटे यांनी संस्थेमार्फत ४० लाख रुपयांचे वैद्यकीय साहित्य आणि औषधे उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये ७५ बेड्स, गाद्या, सर्व लिनन, ७४ साईड टेबल्स, १७ काॅन्सन्ट्रेटर्स, ४ बायपॅप मशिन, ४ नेब्युलायझर्स, २ सक्शन मशिन्स, २७ आय व्ही स्टॅंडस्, ५ मल्टीपॅरामॉनिटर्स, ऑक्सिजन मास्क अशा विविध उपकरणांचा समावेश आहे.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आयुक्त कादंबरी बलकवडे, अध्यक्ष उत्तम फराकटे, माजी नगरसेवक राहुल माने, उपायुक्त निखिल मोरे, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, क्लबचे उपाध्याक्ष रवी डोली, सदस्य महेश खाडंके, बिपीन मिरजकर, रवी पाटील, शीतल फराकटे, श्रीकांत पाटील, गणेश सावंत उपस्थित होते.
फोटो : लक्षतीर्थ वसाहत येथे ३० बेडचे लहान मुलांसाठीच्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आयुक्त कादंबरी बलकवडे, अध्यक्ष उत्तम फराकटे, माजी नगरसेवक राहुल माने, उपायुक्त निखिल मोरे, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर उपस्थित होते.