कोरोनाविरुद्ध लढा जिंकण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:28+5:302021-07-17T04:20:28+5:30
: दहिवडे उपकेंद्रात बालकांना लसीकरण पांगिरे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या विरुद्ध ...
: दहिवडे उपकेंद्रात बालकांना लसीकरण
पांगिरे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या विरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे तसेच ज्यांना लक्षणे दिसताच त्यांनी वेळेत कोविड चाचणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा, असे आवाहन माजी जि.प. सदस्य अर्जुन आबिटकर यांनी केले.
ते दिंडेवाडी( ता. भुदरगड) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव अंतर्गत दिंडेवाडी उपकेंद्रात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या नवीन न्युमोकोकस कान्ज्यूगेट पीसीव्ही लसीकरण शुभारंभप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच श्रीधर भोईटे होते.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत परूळेकर, गारगोटी ग्रा.पं. सदस्य रणधीर शिंदे, अजित चौगले, ग्रामपंचायत सदस्य गणेश मोरबाळे, कपील गुरव आरोग्य सेवक
सतीश भाट, अमोल सुवाशे, रेणुका नाईक
सविता रेडेकर, शाहूताई पाटील यांच्यासह मातापालक उपस्थित होत्या.
फोटो : दिंडेवाडी येथे लसीकरण शुभारंभ करताना माजी जि.प. सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर, सरपंच श्रीधर भोईटे, डॉ चंद्रकांत परूळेकर.