शहरात केवळ १८८ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:17 AM2021-06-21T04:17:33+5:302021-06-21T04:17:33+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवारी तीन प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे व सीपीआर हॉस्पिटल येथे ६० वर्षांवरील ८१ नागरिकांना ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवारी तीन प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे व सीपीआर हॉस्पिटल येथे ६० वर्षांवरील ८१ नागरिकांना कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस तर १०७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. पहिला व दुसरा डोस मिळून १८८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र फिरंगाई येथे ९२, पंचगंगा येथे ११, महाडिक माळ येथे २० व सीपीआर हॉस्पिटल येथे ६५ इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आजअखेर एक लाख २४ हजार १५२ इतक्या पात्र लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे तर ४५ हजार १४१ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसरा डोस घेण्यासाठी आज, सोमवारी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कसबा बावडा, महाडिक माळ व सदर बाझार येथे उपस्थित रहावे तसेच शिक्षणासाठी परदेशात जाणारे विद्यार्थी व सर्व दिव्यांग नागरिकांनी लसीकरणासाठी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.