शहरात केवळ ९१ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:24 AM2021-05-18T04:24:48+5:302021-05-18T04:24:48+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी आठ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात केवळ ९१ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. मंगळवारी कोव्हॅक्सिन लसीचा ...
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी आठ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात केवळ ९१ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. मंगळवारी कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. कोविशिल्ड लस अजूनही उपलब्ध झालेली नसल्याने त्याचे लसीकरण बंद राहणार आहे.
सोमवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र फिरंगाई येथे २३, राजारामपुरी येथे १०, पंचगंगा येथे ७, कसबा बावडा येथे १०, महाडिक माळ येथे २२, आयसोलेशन येथे ९, सदरबाजार येथे ६, सिद्धार्थनगर येथे ४ इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
आज, मंळवारी ४५ वर्षांवरील कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनच्या दुसरा डोस घेण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित राहावयाचे आहे. याकरिता संबंधित नागरी आरोग्य केंद्रावरुन कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी फोन येईल त्यांनीच फक्त संबंधित लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.